उल्हासनगर : उल्हासनगरात क्रिकेटवरील बेटिंगप्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.
मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय? – भाजप
सध्या आयपीएलच्या मॅचेस सुरू आहेत. तर सोमवारी (ता. ४) चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना सुरू असताना त्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती.
माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही – नितीन गडकरी
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी क्रिकेट बुकी विशाल सावलानी याच्या घरी धाड टाकली. त्यावेळेस विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी हे दोघे बेटिंग करताना रंगे हात आढळून आले. यापैकी गिरीश जेसवानी हा उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे. मात्र त्यांच्या मुलाला बेटिंग प्रकरणात अटक झाली आणि यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, डायरी, लॅपटॉप, सिम कार्ड्स, आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. मागील दोन दिवसातली शहरातली ही सट्टेबाजांवर केलेली दुसरी कारवाई आहे. त्यामुळं सट्टेबाज उल्हासनगर शहर सोडून अन्यत्र गेल्याची शहरात चर्चा आहे.
Read Also :
- शिवसेना खासदारपुत्राचा दारूण पराभव; भाजप उमेदवार कोरेंनी चारली धुळ, शिवसेनेत बंडखोरीची शक्यता
- नागपूरात अनिल देशमुखांना जोर का झटका; नगरखेड पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले
- धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दणदणीत विजय; धरती देवरे यांच्या झेंडा फडकला
- अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
- जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाचा झेंडा फडकणार?