नांदेड : उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही, असं सांगतानाच देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना ठणकावले.
मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले
अब्दुल सत्तार आज निवडणूक प्रचारासाठी देगलूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखी आहे. त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडतील, असं सत्तार म्हणाले.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक; राज्य सरकारचा मोठा निर्णय
नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
जरडेंश्वर कारखान्यांवर आयटीचा छापा; अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
Read Also :
- कारखान्यांवरील आयकर विभागाच्या छाप्यासंबंधी रोहित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कालच…
- शरद पवारांच्या गावातही पोहोचले ईडीचे पथक; काटेवाडीत एकाची चौकशी, राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
- पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- राणेंना डच्चू: मुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून बढती; पक्षाने सोपविली मोठी जबाबदारी
- जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक कोण? हे अजित पवारांनी सांगावे – किरीय सोमय्या