सांगली : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्यापही माहिती दिली गेली नाही. एका आमदाराला एक अन् दुसऱ्या आमदाराला एक न्याय का असे विचारले असता तर ‘आम्ही बघतो पाहतो, असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशा शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पडळकर बोलत होते.
प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार, आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. ”महाआघाडीच्या नेत्यांना विकास कामांसाठी आमदारना जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात,” यावर गोपीचंद पडळकर हे कडाडले. बैठकीतून बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या बैठकीचा निषेध केला आहे. ”जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सर्वाना समान न्याय दयायला हवा होता,” पडळकर म्हणाले..
…अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या संबधित कंपन्या, नातेवाईक यांची प्राप्तिकर विभागातर्फे छापेमारी सुरु आहे, याबाबत पडळकर म्हणाले, ”अजित पवार याबाबत काय म्हणतात, याला महत्व नाही, आता आमच्याकडे तपास यंत्रणा का छापा टाकत नाहीत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे असतील, त्यामुळे छापा टाकला असेल,” असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला..
दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही – सुप्रिया सुळे
”महापुरामुळे झालेले नुकसानीची मदत अद्याप काही ठिकाणी मिळाली नाही. माझ्या आटपाडी तालुक्यातील सात गावांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यांना शेतकरी आणि पूरग्रस्तांचे पैसे खायचे आहे,” असा आरोप पडळकर यांनी यावेळी केला. ”एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा, तोंडावर आलेल्या दसरा, दिवाळी मध्येच एस टी कर्मचारी आंदोलन करतील. जनतेचे जे हाल होतील त्याला राज्य सरकार जबाबदार राहील,” असा इशारा एसटी महामंडळामधील कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा दिला आहे..
Read Also :
- मोठी बातमी: शिवसेना स्वबळावर लढणार; राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस-भाजपलाही टक्कर देणार
- राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
- वादाची ठिणगी: संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस; म्हणाले, माफी मागा, अन्यथा…
- अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
- केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत, अन्यथा…: मंत्री एकनाथ शिंदेंनी खडेबोल सुनावले