मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कार्यालयावर छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील बहिणींवरही छापा टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय.
…अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे.
प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झालं. इथेही तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. तिसऱ्या दिवशीही ‘दौंड शुगर’ या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून तपासणी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून कसून तपासणी. अजित पवारांच्या बहिणी डॉ. रजनी इंदुलकर यांच्यासह नीता पाटील यांच्या घरीही सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मोदीबागेत नीता पाटील यांचे घर आहे. याच इमारतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राहतात.
Read Also :
- जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे; गोपीचंद पडळकर कडाडले
- मोठी बातमी: शिवसेना स्वबळावर लढणार; राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस-भाजपलाही टक्कर देणार
- राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
- वादाची ठिणगी: संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस; म्हणाले, माफी मागा, अन्यथा…
- अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन