भोसरी – दिघी रोड येथील महादेव नगर कॉलनी इथे मोठा स्फोट झाला असून या स्फोटात 1 जण मृत्युमुखी व 11 जण जखमी झाले आहेत. मात्र स्फोट कशामुळे झाला या स्फोटाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रविवारी म्हणजेच ९ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजता हि घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी या घटनास्थळी जाऊन तेथील स्फोट झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
अग्निशमनदलाच्या माहितीनुसार हा स्फोट सिलेंडरचा होता मात्र आमदार महेश लांडगे म्हणाले, “हा स्फोट सिलेंडरमुले झाला आहे असं वाट नाही हा स्फोट इतका भीषण स्वरूपाचा होता कि पूर्ण इमारतीच्या चार भिंती कोसळल्या आहेत, तसेच आजूबाजूला जवळपास १०० मीटरच्या रेडियस या स्फोटामुळे सर्व घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तसेच या स्फोटाबाबत पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक माहिती घेत असून लवकरच स्फोट कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.”
तसेच आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने घटनास्थळाजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच त्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनदेखील आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.