अमरावती: अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या अपक्ष खासदार नवनीत राणा कौर २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांचे जात प्रणाणपत्र हायकोर्टाने अवैध ठरवल्याने त्यांना मोठा धक्काच बसला आहे. इतकंच नाही तर कोर्टाने खासदार नवनीत राणा यांना लाखांचा दंड ठोठावला आहे. अमरावती लोकसभा मतदासंघातून शिवसेनेचे दिग्गज खासदार अनंत आडसूळ यांच्या पराभव करत, अपक्ष विजय मिळवला होता.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरुन त्यांना धक्का दिला. इतकंच नाही तर कोर्टाने राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांची खासदारकी धोक्यात असल्याची चर्चेला राजकीय उधाण आले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रिक्त होऊ शकतं. मात्र आता नवनीत राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.