मालेगांव : काँग्रेस पक्षाला एक मोठं भगदाड पडलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्वच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वच्या सर्व काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा झटका आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल
मालेगाव महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ 29 वरुन 27 इतके झाले. पण आता हे सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 47 वर पोहोचले आहे. त्यामुळे 84 जागांच्या सभागृहात राष्ट्रवादीला आता स्पष्ट बहुमत झालं आहे.
काँग्रेस भवनावरून इंदापूरात हायहोल्टेज राडा; हर्षवर्धन पाटील विरुद्ध संजय जगताप संघर्ष पेटणार
मालेगावात शिवसेना आणि काँग्रेसची युती होती. काँग्रेस पक्षाचा महापौर होता तर शिवसेनेचा उपमहापौर होता. पण आता काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या हाती घड्याळ बांधल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे.
Read also:
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेणार का? टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
- गोवा निवडणूक २०२२: जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
- अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार – किरीट सोमय्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
- न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कणकवली पोलिसांत येरझारा; नितेश राणे म्हणतात…