मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष सुरु आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका मैदानाचे उदघाट्न केले ज्या मैदानाचे नाव टिपू सुलतान यांच्या नावावरून देण्यात आले होते. यावरून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेला आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे असं त्यांनी म्हटलं होतं .
सांगलीत भाजपला मोठा धक्का; दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला
त्यावरून पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपच्या काही नगरसेवकांनी टिपू सुलतान नाव मैदानाला देण्यासाठी अनुमोदन दिलेले आहे. त्यामुळे जर त्यांना उलट टीका करायची असेल तर ते करू शकता. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान बद्दल मागील काही काळामध्ये गौरउद्गार काढलेले आहे.
अखेर ठरलं ; अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी होणार ‘या’ नेत्याची निवड
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जेव्हा कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात टिपू सुलतानबद्दल बोलताना म्हटलं होतं कि टिपू सुलतान हा ऐतिहासिक योद्धा होता. तो स्वातंत्र्यसैनिक सैनिक होता. तो एक महान योद्धा होता असं राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. आता भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा मागणार का ? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल
आज भारतीय जनता पक्षातील बरेच इतिहासकार समोर आलेले आहेत. आम्हाला सगळं माहित आहे. कोणी काय केलं ? हे आम्हाला नक्कीच माहित आहे. तुम्ही नवीन इतिहास लिहण्याचा प्रयत्न करू नका असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला हाणला आहे.
Read also:
- गोवा निवडणूक २०२२: जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
- अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार – किरीट सोमय्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
- न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कणकवली पोलिसांत येरझारा; नितेश राणे म्हणतात…
- काँग्रेस भवनावरून इंदापूरात हायहोल्टेज राडा; हर्षवर्धन पाटील विरुद्ध संजय जगताप संघर्ष पेटणार