अहमदनगर : ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्यात आली होती. यामध्ये सत्तारूढ गटाला चांगले यश मिळाले आणि हसन मुश्रीफ यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
सध्या हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री हे अहमदनगर जिल्ह्यात फार कमी दिसतात अशी तक्रार वारंवार जिल्ह्यातील आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. हसन मुश्रीफ यांनी देखील पालकमंत्री पदातून मला मुक्त करा असं कित्येकदा म्हटलं होतं.
राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
मात्र अहमदनगर जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांपैकी कोणालाही जास्त अनुभव नसल्याने पालकमंत्री कोणाला करायचं ? असा पेच राष्ट्रवादीसमोर होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव पालकमंत्री पदासाठी आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे असल्याने त्यांची निवड होणार अशी अफवा देखील पसरली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोण बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड निश्चित करण्यात आली आहे.
‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत आणि त्यांना पालकमंत्रिपद देणं उचित ठरणार नाही असा काहीसा सूर राष्ट्रवादीतून निघत होता. दिलीप वळसे पाटलांच्या नावावर पक्ष श्रेष्ठींत सहमती झाली. त्यानुसार वळसे पाटलांकडे पुन्हा एकदा अहमदनगरचे पालकमंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे आता लवकरच पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळण्याची चिन्हे आहेत.
Read also:
- सांगलीत भाजपला मोठा धक्का; दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला
- गोव्यात सत्ता तर भाजपचीचं येणार, मनात मांडे खाऊ नका – चंद्रकांत पाटील
- ‘मायकल लोबो कचरा घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांच्या हाती फक्त राखच येणार’
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा