मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. भारतीय जनता पक्षाशी काडीमोड केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चांगलाच सलोखा जमवून घेतला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप असा संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळत आहे.
चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया हे वादात सापडले. नगरविकास मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून किरीट सोमैया यांनी सरकारी फाईल तपासल्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्यावरून पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात
या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीसही प्राप्त झाली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर संताप व्यक्त करत, जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे.
मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
भाजपचे नेते असणाऱ्या किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!” असं देखील देवेंद्र फडणीस यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.सरकारी कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांना सुद्धा नोटीसा!, हाच का तुमचा पारदर्शी कारभार?” असा सवाल देखील फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
Read also:
- महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
- किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
- सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
- आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
- स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मुलीचं भाजपमध्ये स्थान आहे तरी काय? संजय राऊतांचा पलटवार