मुंबई : सध्या राजकारणात एकमेकांवर टीकेची झोड उठत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही असेच वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कथित भ्रष्टाचार उघड करणाऱ्या सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत मलिकांनी टीका केली आहे.
निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
जशी चित्रपट चालवण्यासाठी आयटर्म गर्लची गरज असते. तसेच राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या ‘आयटम गर्ल’सारखे राजकारण करत आहेत. बातम्यांसाठी आयटम गर्ल कार्यक्रम सुरू आहे. बातमी कशी होईल, यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे.
दरम्यान, सोमवारी किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फायली तपासल्या, यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. सोमय्यांनी माहिती अधिकारात फाइल्स तपासण्याची परवानगी घेतली नसेल, तर त्यांच्यावर शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
Read also:
- सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
- आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
- स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मुलीचं भाजपमध्ये स्थान आहे तरी काय? संजय राऊतांचा पलटवार
- मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
- कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात