म्हापसा : गोव्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष दिलीप परुळेकर आता नव्या जोशासह ते कामाला लागले आहे. परुळेकर यांनी आपल्या पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करणार असल्याचे सांगितले आहे. विजयासाठी आपण २०० टक्के प्रयत्न करणार आहे. आपल्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे.
नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…
गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी येत्या चार ते आठ दिवसांत होतील. त्यानंतर आपण कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कामाला सुरूवात करणार आहे, असे ते म्हणाले.
शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
त्या अनुषंगाने आपल्याला आपला साळगाव मतदारसंघ सर्वांत महत्वाचा आहे आणि त्यासाठी पहिले कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर राहण्यासाठी उद्युक्त करण्याचे. बार्देश तालुक्यातील कळंगुट, म्हापसा, साळगाव, पर्वरी या मतदारसंघांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर राहण्यासाठी उद्युक्त करणार असल्याचे देखील सांगितले.
नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
आता आमचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर योग्य संख्येने युवकांना नोकऱ्या मिळतील. सावंत सरकारने दहा ते बारा हजार नोकऱ्यांची निर्मिती केलेली आहे, असे परुळेकर म्हणाले. सावंत सरकारने दहा ते बारा हजार नोकऱ्यांची निर्मिती केलेली आहे, असे परुळेकर म्हणाले.
Read also:
- कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात
- उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात काँग्रेसच टेन्शन वाढलं; राजेश क्षीरसागरांना मात्र मिळालं नवं बळ
- निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
- भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…
- औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम