मुंबई : शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त एक ट्विट करत भारतीय जनता पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संजय राऊत यांनी एक जुने व्यंगचित्र ट्विट केले होते.
शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
यावरून भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी कमालीचा संताप व्यक्त केला आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरमरीत उत्तर दिले. स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका असं देखील पूनम महाजन यांनी म्हटलं होतं.
नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
त्यावर आता संजय राऊत यांनी आपल्या भाषेत पूनम महाजन यांना उत्तर दिलं आहे. पूनम महाजन यांनी मी केलेल्या ट्विटवरून इतकं अस्वथ होण्यासारखं काहीच कारण नाही. मी काही प्रमोद महाजन यांच्यावर टीका टिप्पणी केलेली नाही. मला केवळ शिवसेना-भाजप युतीच्या सुरुवातीच्या काळात काय अवस्था होती, हे दाखवून द्यायचे होते. मी जे व्यंगचित्र ट्विट केलं होतं ते मी काढलेलं नाही. आर.के. लक्ष्मण यांचे हे व्यंगचित्र त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर छापून आले होते. पुनम महाजन या भाजपच्या खासदार आहेत. पण त्या आजकाल कुठे आहेत, हे माहिती नाही.
औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
भाजप पक्ष जेव्हा काहीच नव्हता तेव्हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजप रुजवण्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि मनोहर पर्रिकर या नेत्यांचे मोठे योगदान आहे. पण आजच्या भाजपमध्ये महाजन, मुंडे आणि पर्रिकर कुटुंबीय अंधारात गेले आहेत,असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे. भाजपात सध्या बऱ्याच नव्या नेत्यांची फळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे इतिहासाची फाडलेली पाने नाहीत. त्यामुळे त्यांना हा सगळा इतिहास अवगत नाही. परंतु, आम्ही भाजपच्या नव्या नेत्यांना वेळोवेळी याची आठवण करुन देऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Read also:
- मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
- कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात
- उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात काँग्रेसच टेन्शन वाढलं; राजेश क्षीरसागरांना मात्र मिळालं नवं बळ
- निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
- भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…