सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर शिवसेनेचा जिल्हा बँकेत पराभव झाला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. जिल्हा बँकेत नारायण राणे यांनी मनीष दळवी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.
औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
त्यानंतर दोन वेळेस न्यायालयात नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र दोन्ही वेळेस न्यायालयाने नितेश राणे यांचा जमीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे हे बऱ्याच दिवस अज्ञातवासात होते. काल अचानक बऱ्याच दिवसांपासून फरार असलेले नितेश राणे हे प्रथमच कणकवली न्यायालयात हजर झाले. सुमारे एक तास नितेश राणे यांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती.
भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…
उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज १७ जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता आणि तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. मात्र आता या प्रकरणी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्यासमोर २७ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.
Read also:
- स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मुलीचं भाजपमध्ये स्थान आहे तरी काय? संजय राऊतांचा पलटवार
- मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
- कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात
- उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात काँग्रेसच टेन्शन वाढलं; राजेश क्षीरसागरांना मात्र मिळालं नवं बळ
- निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन