मुंबई : सध्या राज्यात महावितरण विभागाकडून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेविरोधात राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आंदोलन छेडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गावातील महावितरण कार्यालयातच आंदोलन केले आहे.
निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मुळा धरण भागात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डीले यांच्यासहित संपूर्ण भाजपवर कडकडून टीका केली आहे. राज्यात भाजप सरकारच्या काळात महावितरणची मोठी आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. आता केंद्रात देखील भाजपची सत्ता आहे. आता केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीयकृत बँकांवर निर्बंध लादून वीज कंपन्यांची आर्थिक गळचेपी सुरू आहे. महावितरणची कोंडी करण्याचे भाजपचे धोरण संशयास्पद आहे.
त्यामुळे भाजपने महावितरण विभागाच्या विरोधात आंदोलन करणे किंवा कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्याचा अधिकारच त्यांनी गमावला आहे असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला आणि शिवाजी कर्डीले यांना मारला आहे. ज्यात भाजप सरकारच्या काळात कृषिपंपांची तीस हजार कोटींची थकबाकी झाली होती. त्या तुलनेत शासनातर्फे निम्म्या वीजबिलाची आर्थिक मदत महावितरणला अपेक्षित होती.
कांदोळकरांना मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवणे पडू शकते महागात
भाजप सरकारने महावितरण विभागाची कोंडी कारण्याहेतू फक्त चार ते पाच हजार कोटींची तुटपुंजी मदत केली. नंतर कोरोना संकटात वीजबिल वसुली घटली. महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली आहे. महावितरण विभागाला या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी बँकाच्या कर्जाशिवाय पर्याय नाही. त्यातही केंद्र सरकारने नवीन परिपत्रकाद्वारे, वार्षिक महसुलाच्या २५ टक्क्यांपर्यंत खेळते भांडवल द्यावे, असे जाचक नियम लागू केले आहेत. त्यामुळे कंपनी जिवंत ठेवण्यासाठी ग्राहकांकडून थकीत वीजबिलांची वसुली, एवढाच पर्याय राहिलेला आहे अशी माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली आहे.
Read also:
- किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
- सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
- आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
- स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मुलीचं भाजपमध्ये स्थान आहे तरी काय? संजय राऊतांचा पलटवार
- मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!