पणजी : कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपला मजबूत उमेदवार नव्हता. मात्र सिकेरा यांच्या रूपाने भाजपला कळंगुटमध्ये मजबूत उमेदवार मिळालेला आहे. सिक्वेरा हे कळंगुट पंचायतीचे अनेक वर्षे सरपंच होते. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग व मतदार आहेत . त्यामुळे कळंगुट सर करण्यास सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपच्या हाती एक मजबूत मोहरा लागला आहे .
आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
याप्रसंगी बोलताना वाहतूक मंत्री मावीन गुद्धीनो यांनी लोबो यांच्यावर जोरदार टीका करत सांगितले की भाजप सरकारने त्याला कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री केले. मात्र त्यांच्याकडे राज्यातील कचरा सुव्यवस्थितपणे नष्ट करणे जमले नाही. तो कचरा घेऊन ते कॉंग्रेसमध्ये गेलेत आणि त्यांच्या हाती फक्त राखच येणार असल्याचेही गुध्दीनो म्हणाले.
सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
सिक्वेरा हे चांगले नेते असून कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा चांगला वरचष्मा आहे. सरपंच म्हणून त्यांनी अनेक वर्षे लोकांची सेवा केलेली आहे. भाजप सरकारने केलेला विकास लोकांसमोर आहे. रस्त्यांचे जाळे विकास प्रकल्पांचे जाळे आणि एकूणच गोव्याचा झालेला भरीव विकास तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक उत्कृष्ट पंतप्रधान लाभले आहेत. त्यांच्या कडून देशाचा झालेला विकास लोकासमोर आहे. या सर्वांच्या बळावर येत्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल. असे गुध्दीनो म्हणाले.
किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
लोबो पत्नीला उमेदवारी मिळत नाही म्हणून भाजप सोडून गेले. मात्र त्यांना पश्चाताप करावा लागणार असल्याचे सांगून सिक्वेरा एक चांगले उमेदवार आहेत. असे गुध्दीनो म्हणाले. मायकल लोबो यांनी टॅक्सी चालकांची नेहमीच दिशाभूल करून त्यांना संकटात टाकले आहे. ते थेट आपल्याकडे येऊ नयेत यासाठी लोबो यांनी मध्यस्थी करून उलट टॅक्सी चालकांना त्रासात टाकले. त्यामुळे टॅक्सी चालक लोबो यांना यावेळी मतदान करणार नाहीत. असा विश्वास गुध्दीनो यांनी यावेळी व्यक्त केला .
महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
या प्रसंगी बोलताना तानावडे यांनी सांगितले की कळंगुट मध्ये जोसेफ सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपला एक चांगला नेता मिळाला असून येत्या निवडणुकीत कळंगुटमध्ये नक्कीच भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे. दरम्यान, लोबो हे बार्देशमध्ये बादशाह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच ते म्हापसा मतदार संघासह अन्य मतदार संघात देखील लुडबुड करत आहेत. हे सर्व सुरु असताना जोसेफ सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिल्याने आता लोबो यांना त्यांच्याच मतदार संघातून निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जोसेफ सिक्वेरा यांनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे लोबो यांना कळंगुटमध्येच अडकवून ठेवण्यात भाजप यशस्वी झाली आहे.
Read also:
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
- महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल