मुंबई : ज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. भारतीय जनता पक्षाशी काडीमोड केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चांगलाच सलोखा जमवून घेतला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप असा संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळत आहे.
मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून भाजपने आता शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सवाल उपस्थित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाब्दिक फटकारा मारला होता. तुमच्याकडून साधं औरंगाबादचं संभाजीनगर करणं झालं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करणं झालं नाही. कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. टाळ्या वाजवूंन मतं मिळवणं ही काही शिवसेनेची संस्कृती नाही आणि कधी नसणारही. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांनी आम्हाला ते कधीही शिकवलं नाही. संभाजीनगर नावाचा प्रश्न नक्कीच आहे. मात्र येथील विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे करण्याचा ठराव विधानसभेने मंजूर केला व केंद्र सरकारच्या मंजूरीसाठी तो पाठवला आहे. हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारने मंजूर करून दिलेला नाही. त्यामुळे वारंवार त्याची केंद्र सरकार आठवण करून द्यावी लागत आहे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
शिवसेनेने संभाजीनगरकरांना आतापर्यंत दिलेली अनेक वचन ही पूर्णत्वास नेलेली आहेत. त्यामुळे संभाजीनगरकरांनी महानगरपालिकेवरील भगवा खाली उतरू दिला नाही आणि उतरुही देणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. पहिलं नाट्यगृह संत एकनाथ रंगमंदिराचं नूतनीकरण केल्यानंतर संभाजीनगरकरांना सुद्धा आनंदाचा एक ठेवा मिळेल असेही,मुख्यमंत्री म्हणाले.
Read also:
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
- महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
- महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
- किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य