मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. मानेच्या आणि पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वर्षा बंगल्यावर आराम करत होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठणठणीत बरे झाले आहेत आणि विरोधकांवर त्यांनी टीकांचे बाण मारण्यास सुरुवात केली आहे.
आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
यावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल ऐकून आनंद झाला असं म्हटलं आहे. याचबरोबर एमपीएससी परीक्षांमध्ये जो काही सध्या सावळागोंधळ सुरु आहे त्याबद्दल देखील त्यांनी एक महत्वाची मागणी देखील केली आहे.
सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळपास साडे तीन हजार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल मागणी करत आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२०मध्ये महाराष्ट्रात मोठा गोंधळ समोर आलेला आहे. नुकतेच उच्च न्यायालायने ८३ विद्यार्थ्यांना परीक्षांची परवानगी दिली होती. मात्र उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च न्यायालयाचा दरवाजा थोटवला नव्हता. मग आता या आर्थिक दृष्टीने मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी न्याय कसा मिळणार ? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने आता त्वरीत विचार करायला हवा. मला राज्य सरकारला हे सांगायचं की, एमपीएससीने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे हे, उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने आता एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा गंभीर इशारा गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला.
Read also:
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
- महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
- महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे