इंदापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त काल इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या भवनात कुलूप लावण्यावरून चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला. काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील काँग्रेस भवनाला कुलूप लावण्यात आले होते. या बंद काँग्रेस भवनाचे कुलूप काल पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी तोडले. त्यावरुन इंदापूर तालुक्यात चांगलाच हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
प्रजासत्ताकदिनानिमित्त काँग्रेस भवनचे कुलूप तोडून आमदार संजय जगताप यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी हे भवन काँग्रेसचे म्हणजे आमचेच असल्याचा दावा केला. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही मालमत्ता ट्रस्टची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये आता काँग्रेस भवनावरुन संजय जगताप आणि हर्षवर्धन पाटील आमने-सामने आले आहेत.
यावरून हर्षवर्धन पाटील आणि आमदार संजय जगताप यांच्यात तुतू मैमै झालेली पाहायला मिळाली आहे. कुलूप तोडण्याबद्दल आमदार जगताप म्हणाले की हे जे कार्यालय माजी मंत्री शंकररावजी पाटील यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षासाठी बांधले होते. २०१९ ला या कार्यालयाची नोंदणी इंदापूर काँग्रेस स्ट्रस्ट नावाने केली आहे आणि २०१५ ला हे ट्रस्ट उभे राहिले आहे. याची केस आम्ही महसूल विभागात लढलो आहोत. महसूल विभागाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे हे भवन काँग्रेस पक्षाचे आहे हे सिद्ध झाले आहे. या भवनाचे आता नूतनीकरण झाले असून लवकरच हे भवन जनतेसाठी खुले करू अशी माहिती संजय जगताप यांनी दिली आहे. यावेळी काँग्रेस भवनाबाहेर बराच काळ तंव वाढला होता.
Read also:
- मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल
- अखेर ठरलं ; अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी होणार ‘या’ नेत्याची निवड
- सांगलीत भाजपला मोठा धक्का; दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला
- गोव्यात सत्ता तर भाजपचीचं येणार, मनात मांडे खाऊ नका – चंद्रकांत पाटील
- ‘मायकल लोबो कचरा घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांच्या हाती फक्त राखच येणार’