मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांची प्रकृती बिघडली आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुसळधार पावसात मुंबईत 22 मृत्यू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नुकसान भरपाईची घोषणा
महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted due to chest pain in a hospital in the city, says BMC Mayor's Office
(File pic) pic.twitter.com/R5deDUThr1
— ANI (@ANI) July 18, 2021
महापौर किशोरी पेडणेकर या सर्वात अॅक्टिव्ह महापौर म्हणून ओळखल्या जातात. कोविड संकट काळात त्यांनी स्वत: रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयीन व्यवस्थेची पाहणी केली होती. स्वत: नर्स असल्याने त्यांनी रुग्णांची सेवा करण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच अनेक बैठका घेऊन आणि तातडीने उपाययोजना करून त्यांनी मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात आणली. डॉक्टरांचं मनोबल उंचावण्यापासून ते रुग्णांच्या भेटीगाठी घेण्यासह अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचं कामही त्यांनी या काळात केलं आहे. मुंबईत कोणतीही घटना घडल्यास पेडणेकर स्वत: त्या ठिकाणी हजर असतात. कामाची व्यस्तता, सततची धावपळ आणि दगदग यामुळेही त्यांची प्रकृती बिघडली असावी असं सांगण्यात येतं.
Read Also :
- पवारांनी एनडीए’त यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं – रामदास आठवले
- “काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याची आठवण करून दिलेली बरी”; शिवसेना-राष्ट्रवादीच्या रस्सीखेचात काँग्रेसची एन्ट्री
- राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील
- भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार?, शंभुराज देसाई म्हणतात…
- चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आणि केंद्राकडून मदत जाहीर