मुंबई : चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसात मुंबईत 22 मृत्यू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नुकसान भरपाईची घोषणा
त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्या आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली.
Maharashtra CM Uddhav Thackeray has expressed grief over the deaths in accidents at Chembur & Vikhroli due to torrential rains & announced that the government would pay Rs 5 lakh each to the heirs of the deceased & free treatment would be given to the injured: CMO
— ANI (@ANI) July 18, 2021
शरद पवार-संजय राऊत एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी रवाना!
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे, विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे त्यांनी जाहीर केले.
आजही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरू ठेवावे, मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
Read Also :
- मोदी पवारांच्या भेटीमध्ये तासभर काय शिजलं; खुद्द शरद पवारांनीच केला खुलासा… वाचा सविस्तर…
- धक्के पे धक्का : अनिल देशमुख यांच्या मूळगावी EDची छापेमारी
- अखेर तो योग जुळून आला; चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात १५ मिनिट खलबंत
- नाना पटोले यांचे खंदे समर्थक भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश
- ‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’; चित्रा वाघ पुन्हा राऊतांवर बरसल्या