नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली. त्यानंतर आता ईडीचं पथक वडविहिरा येथून पाहणी पाहून करुन निघाले आहे. मात्र यावेळी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात नारेबाजी केली आहे.
अबब! अनिल देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची खरी किंमत वाचून डोळे पांढरे होतील…
गावकऱ्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला. ईडी “चलो जाव” आणि मुर्दाबादच्या घोषणा यावेळी गावकऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच अनिल देशमुखांच्या काटोल येथील देशमुखांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत शोधमोहीम सुरु केली.
मुसळधार पावसात मुंबईत 22 मृत्यू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नुकसान भरपाईची घोषणा
दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत ४.२० कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला.
Read Also :
- अखेर तो योग जुळून आला; चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात १५ मिनिट खलबंत
- नाना पटोले यांचे खंदे समर्थक भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश
- ‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’; चित्रा वाघ पुन्हा राऊतांवर बरसल्या
- तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका; शिवसेनाने काढली खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण