सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार न्यायालयानं १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
बंडातात्यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी कराडकरांची जाहीर माफी
सिंधुदुर्गातील शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केली होती. त्यानंतर संशयाची सुई नितेश राणेंभोवती फिरत होती. त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता ते हजर झाले नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत होते. पण, नितेश राणे कुठे होते? हे कोणाला माहिती नव्हते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयाला शरण येण्यास सांगितले.
‘भाजप सत्तेवर आले तर आपल्याविरुद्ध कारवाई अटळ हे लोबोंना समजून चुकले आहे’
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज देखील केला. पण, राणेंनी शरण न येता अर्ज केला, असं म्हणत न्यायालयानं जामीन फेटाळून लावला. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, कणकवली पोलिसांनी संतोष परब हल्लाप्रकरणी चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयानं नितेश राणेंना पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी गोव्याला नेल्याची माहिती देखील होती.
कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले… संस्कृती नेमकी…
नितेश राणेंना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजून युक्तीवाद करण्यात आला. आमची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे नितेश राणेंची पोलिस कोठडी वाढवून द्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
Read also:
- भाजपामधील नाराजांना राष्ट्रवादीचे ‘रेडकार्पेट’ अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी?
- म्हापशाला लवकरच ग्रीन सिटी बनविणार; भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांची ग्वाही
- स्त्रीयांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना भान राखावं; बंडातात्याच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार
- असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, दोन गोळ्या कारमध्ये घुसल्या, काय घडलं नेमकं…