लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन ते चार राऊंड गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या आहेत. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटवरुन गोळीबार झाल्याची माहिती दिली आहे.
बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. 4 राऊंड गोळीबार करण्यात आला. 3-4 जण होते. सर्वजण आपली शस्त्रं तिथेच टाकून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदु ‘लिलाह.’
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
दरम्यान, ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यातही घेतले आहे. अतिरिक्त एसपी हापूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील रहिवासी असलेल्या सचिन आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हा गोळीबार केला होता. ताब्यात घेतलेल्या सचिनकडून 9 एमएमचे पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Read also:
- कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले… संस्कृती नेमकी…
- ‘भाजप सत्तेवर आले तर आपल्याविरुद्ध कारवाई अटळ हे लोबोंना समजून चुकले आहे’=
- बंडातात्यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी कराडकरांची जाहीर माफी
- बंडातात्या दारु पिऊन बोलले; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांचे जशास-तसे प्रत्यूत्तर
- केंद्रीय मंत्री दानवेंना अब्दुल सत्तार देणार आणखी एक धक्का; पाच हजार कार्यकर्त्यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश