सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित इतर सामाजिक घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या” म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी चांगले असले तरी त्यांना अजित पवार यांनी इतरांमुळे तसं करावं लागलं.
‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’
दुसरीकडं त्यांनी एक वक्तव्य केलं जे वादग्रस्त ठरलं. या वक्तव्यावरून सर्वच पक्ष बंडातात्यांविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र समोर आले आहे. महिला नेत्या अक्रमक झाल्या असून यावक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त महाराष्ट्र संघाच्या इतर भादंवि कलम १८८, २६९, २७० तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियम १८८७ अंतर्गत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भडकाऊ भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.
शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत
याप्रकरणी राज्यातील महिला आयोगाने लक्ष घातले असून महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दलसातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन या बाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पाटील यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ मामाजींना भेटावं; मंत्री नवाब मलिकांचा अजब सल्ला
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे. याबाबत त्यांनी जाहीररीत्या माफी मागावी अशी मागणी रुपाली चाकणकरांसहित आमदार मनीषा कायंदे, खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा असा आदेश देखील रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
Read also:
- नितेश राणेंकडून अमित शाहांचा फोटो असलेलं ‘ते’ ट्विट अचानक डिलीट; काय घडलं नेमकं…
- अजितदादा, अशा नालायकापासून आम्हाला वाचवा; गोपीचंद पडळकरांनी केला व्हिडिओ व्हायरलं
- अखेर ठाकरे सरकारची माघार; भाजपच्या १२ आमदारांच निलंबन घेणार मागे?
- दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
- उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर