महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये २०१२मध्ये सत्ता मिळवली होती. त्यानंतर पक्षाची अवस्था बिकट असली तरी गटबाजी मात्र थांबलेली नाही. त्यातच मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्षपदापासून मुक्त करण्याची मागणी करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.
शिवसेनेने २०१९मध्ये पश्चिम विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट नाकारल्याने दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर दिलीप दातीर यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आज त्यांनी त्याबाबत राज ठाकरे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती केली असून ती विनंती मान्य करावी, असे पत्र राज ठाकरेंकडे पाठविले आहे. मात्र, राजीनामा देण्याची प्रक्रिया गुप्त असल्याने फोटो व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना न्याय देण्यात मी कमी पडत असल्याचे त्यात म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्र सैनिक म्हणून मी कायम बांधील राहील असेही दिलीप दातीर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे दिलीप दातीर हे मनसेत राहणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
मात्र, दुसरीकडे आगामी काळातील निवडणुका आणि पालिकेतील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहे. त्यामुळे दातीर यांना थेट पक्षालाच सोडचिठ्ठी तर द्यायची नाही ना? असेही बोलले जात आहे. दरम्यान, दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता आपला व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा दिला असून आपण पक्ष सोडलेला नाही. पुढील आठवड्यात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.
Read also
हेही वाचा… अजित पवारांच्या खुलाश्यानंतरही शरद पवारांची सावध भूमिका; प्रत्येक आमदाराला फोन…
हेही वाचा… “अजित पवारांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस”; सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… भावी खासदार राष्ट्रवादीचा? पुण्यात पुन्हा बॅनरबाजी..!
हेही वाचा… अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!