पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून येत्या सहा महिन्यात या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे. आता पुणे शहरात पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा… “त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक?”; अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलचं झापलं..!
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले आहेत. पुण्यातील वडगाव परिसरात अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. याआधीही प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता प्रत्यक्षात बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यातच या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांकडून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच प्रशांत जगताप यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा होताना दिसत आहे.
हेही वाचा… भाजपसोबत जाणार की नाही?; अजित पवारांकडून मोठा खुलासा
दरम्यान, यापूर्वी भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर भावी खासदार म्हणून लावण्यात आले होते. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असे लिहिले आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे या बॅनरवर लिहिले आहे.
Read also
हेही वाचा… अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!
हेही वाचा… “सर्वांचीच तोंडे बंद…”; अजित पवारांच्या खुलाशानंतर मिटकरींचा टोला