अजित पवार यांनी त्यांच्या भाजप पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लावला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत, असे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या समोर स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे खरंच अजित पवार यांच्या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम लागल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा… दोन दिवसांपासून नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल; अजित पवारांसोबत बैठक..!
अजित पवार यांनी त्यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत उठलेल्या चर्चांवर पडदा टाकल्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले. “सर्वांचीच तोंडे बंद….#एकचवादाअजितदादा” असे ट्वीट अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना समर्थनात असलेले आमदार हे राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या समोर दिलेल्या माहितीमुळे अनेकांची तोंडे बंद झाली असल्याचे मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून लिहिले आहे.
सर्वांचीच तोंडे बंद….#एकचवादाअजितदादा
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 18, 2023
महत्त्वाची बाब म्हणजे, अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे मात्र अनेक चर्चांना उधाण आले होते. “अजित पवारांबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या मिथ्या आहेत. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की, ‘सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय,” असे अमोल मिटकरी यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या गोटात खरेच असे काही सुरू आहे, का? अशा चर्चांना उत आला होता.
Read also
हेही वाचा… “त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक?”; अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलचं झापलं..!
हेही वाचा… भाजपसोबत जाणार की नाही?; अजित पवारांकडून मोठा खुलासा
हेही वाचा… अजितदादांच्या चर्चांवर फडणवीसांची चुप्पी म्हणजे राजकीय भूकंपापूर्वीची शांताता?
हेही वाचा… Breaking News : अजित पवार यांनी सोशल अकाउंटवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!