जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार, असं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. अजित पवार नेमकं काय म्हणाले पहा?
34 आमदारांसह अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबद्दल अजित पवारांनी खुलासा केला. याच वेळी त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख न करता तिखट शब्दात सुनावलं.अजित पवार म्हणाले, “आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे. आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला.
हेही वाचा… “अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य”; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने दिलं जाहीर समर्थन
अजित पवार असंही म्हणाले की, “तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत.”
“आमचं वकीलपत्र दुसऱ्या कुणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ता, आमच्या पक्षाचे नेते मग राष्ट्रीय स्तरावरचे असतील किंवा राज्य स्तरावरील असतील, हे त्याबाबतीत मजबूत आहे”, अशा तिखट शब्दात अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
Read also
हेही वाचा… भाजपसोबत जाणार की नाही?; अजित पवारांकडून मोठा खुलासा
हेही वाचा… अजितदादांच्या चर्चांवर फडणवीसांची चुप्पी म्हणजे राजकीय भूकंपापूर्वीची शांताता?
हेही वाचा… Breaking News : अजित पवार यांनी सोशल अकाउंटवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!
हेही वाचा… दोन दिवसांपासून नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल; अजित पवारांसोबत बैठक..!