विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचे बोलले जाते. अलीकडील अजित पवारांची विधाने पाहिली असता दादा सरकारबद्दल कुठेही आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
त्यात आता राष्ट्रवादी आमदारांनीही उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही गट पडणार का? असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी येथील आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती १०० टक्के मान्य आहे असं विधान केले आहे. बनसोडे म्हणाले की, मी मागील काळातही अजितदादांसोबत होतो. उद्या अजितदादा जी भूमिका घेतील मी त्यांच्यासोबत ठाम असणार आहे. मी दादांचा कट्टर समर्थक आहे. माझा अजितदादांवर विश्वास आहे. दादा जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
Read also
हेही वाचा… “३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम”; बावनकुळेंचं पुन्हा मोठे विधान
हेही वाचा… महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल..!
हेही वाचा… मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!