गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज अजित पवार यांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते तिथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आता यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण
दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत नाही अजित पवार हे भाजपसोबत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोबतच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
Read also
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
हेही वाचा… “पवारांच्या मूक संमतीनेच राष्ट्रवादीचे लोक भाजपकडे जाणार”, शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित