मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा खूपच रंगल्या आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. परंतु शरद पवारांची भाजपसोबत सुरू असलेली जवळीक पाहता शिंदे गटाच्या आमदाराने मोठा दावा केला आहे.
हेही वाचा… अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटरचं कनेक्शन नाशकात, STF ने एकाला घेतलं ताब्यात..!
भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबाला लक्ष केले जात आहे. कुणाला भाजपसोबत जायचे असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल, पक्षाचा नसेल. परंतु राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही. राष्ट्रवादी महाविकास आघाडीचाच भाग असेल, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचा दावा संजय राऊतांनी आज केला आहे. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा… माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक
संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी सूचक इशारा दिला असावा, असे मला वाटत आहे. दीड तासांची बैठक चहा-पाण्यावर किंवा एक वाक्य बोलून होत नसते. पवारांनी उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचे नाही. परंतु त्यांचा कल भाजपकडे आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपबरोबर गेल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल, असेही शिरसाट म्हणाले.
Read also
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण