पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात, या शक्यतांवर त्यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलंय. मात्र अजित पवार जेव्हा अचानक गायब होतात, तेव्हा दाल मे कुछ काला… दिसू लागतं. काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केला.
हेही वाचा… माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक
पुण्यात आज अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती आहे. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा… नाशिकमध्ये राजकीय भूकंप, भुजबळांचे निष्ठावंतसह माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये
अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं. अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
Read also
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण
हेही वाचा… अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटरचं कनेक्शन नाशकात, STF ने एकाला घेतलं ताब्यात..!