नाशिक महापालिका निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये येऊन गेले. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत.
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने घडाळ्याबाबत…
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. मोरे भाजपमध्ये आल्यास नाशिकच्या राजकारणात फार मोठे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. नाशिकच्या सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. तसेच सटाण्याचे ते माजी नगराध्यक्ष आहेत. या शिवाय छगन भुजबळ चालवत असलेल्या समता परिषदेचे ते माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत.
हेही वाचा… “तुफान आ रहा है…”,मुंबईत अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची होणार परीक्षा?
मोरे यांच्या प्रवेशाने भाजपला नाशिक ग्रामीणमध्ये मोठी ताकद मिळणार आहे. शहर विकास आघाडीचे ११ माजी नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मोरे यांच्याकडूनच भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोरे यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आहे. फक्त प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.
Read also
हेही वाचा… ‘फडणवीस हे जादूगार, भविष्यात काय जादू करायची हे जादूगरच ठरवतो’
हेही वाचा… “ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड”
हेही वाचा… अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; अजूनही नाराजी कायम?
हेही वाचा.. मातोश्रीबाहेर अमित शहांच्या स्वागताचे मोठं पोस्टर, भाजपकडून डिवचण्याचा प्रयत्न?