“फडणवीस जादूगार आहेत, ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांनी पूर्वीही अशीच जादू केली आहे”, अशी स्तुतिस्तुमने भाजपचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उधळली आहेत.
हेही वाचा… “तुफान आ रहा है…”,मुंबईत अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची होणार परीक्षा?
नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यावरुन विचारले असता विखे पाटील यांनी भविष्यात काहीही होऊ शकते, असं म्हटलं आहे. याचवेळी महाविकास आघीडीवरही त्यांनी तोंडसुख घेतलं. शहरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा… मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाला, माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार यांच्या मोबाईलला रेंज नसेल्याने संपर्क होऊ शकला नसेल, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता ते फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. परंतु, फडणवीस हे जादूगर आहेत ते कधी काय जादू करतील हे सांगता येत नाही. त्यांनी पूर्वीही एक जादू केली आहे. त्यामुळे भविष्यात काय जादू करायची हे तो जादूगरच ठरवत असतो. मी काही सांगू शकत नाही, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आघाडीत पहिल्यापासूनच बिघाडी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही नाराजी पुढे येईल असेही ते म्हणाले.
Read also
हेही वाचा… “ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड”
हेही वाचा… अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; अजूनही नाराजी कायम?
हेही वाचा.. मातोश्रीबाहेर अमित शहांच्या स्वागताचे मोठं पोस्टर, भाजपकडून डिवचण्याचा प्रयत्न?
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने घडाळ्याबाबत…