राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत तर्क वितर्क केले जात होते. पण पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली.
हेही वाचा… “राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी सावरकरांची माफी मागावी”
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कर्नाटकमध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार आहोत. आमचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याकडून कर्नाटकात पाच ते सहा सभा घेणार आहेत
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. २३ वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भाजपविरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तिन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला हा मोठा दणका आहे.
हेही वाचा… काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच ‘मातोश्री’वर..!
याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षांकडून खुलासा मागवत या पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाचा आढावा घेतला होता, तर दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
Read also
हेही वाचा… “तुफान आ रहा है…”,मुंबईत अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची होणार परीक्षा?
हेही वाचा… मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाला, माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का?; अमोल कोल्हे यांनी दिलं उत्तर
हेही वाचा… माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का