आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं… असं सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यामुळे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी यूटर्न घेतला आहे.
मी नाराज नाही यावर माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा होते. पण ही वस्तुस्थिती नाही. मी बिलकूल नाराज नाही. खासदार म्हणून काम करत असताना 100 दिवस मी दिल्लीत असतो. कार्यक्रमाला उपस्थिती दिसली नाही की अशा चर्चा सुरू होतात. नाराजीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. नाराज असण्याच कारणच नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे अमोल कोल्हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा… राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देणार?
2024 ला मी शरद पवार यांच्या सोबतच असणार आहे. माझ्या विषयीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत. 2024 साठी शिरूर लोकसभा मतदारसंघ काही माझी जहाँगिरी नाही. पाच वर्षाची जबाबदारी मी माझ्या परिने व्यवस्थित पूर्ण करत आहे. पक्ष पुन्हा शिरूरमधून संधी देईल की नाही याबद्दल एक वर्ष अगोदर चर्चा करणं चुकीचं आहे. 2024 चा मी नक्की विचार करेन. पण आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधणे हे माझ्या स्वभावात हे बसत नाही, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
Read also
हेही वाचा… माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का
हेही वाचा… “राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी सावरकरांची माफी मागावी”
हेही वाचा… काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच ‘मातोश्री’वर..!
हेही वाचा… सचिन वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून मोठा खुलासा…