केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबई महापालिकेवर यंदा भाजपचाच झेंडा फडकवायचा, असा चंग भाजपने बांधलाय. तर कोणत्याही स्थितीत शिवसेनेचा हा गड राखायचाच, असा पण ठाकरे गटानं केलाय. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे ठाकरे गटाला धडकी बसली आहे, अशी खोचक टीका भाजपकडून करण्यात येतेय.
हेही वाचा… माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला मोठा धक्का
अमित शहांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जात नाहीये. मातोश्रीबाहेर पडताच या परिसरात अमित शाह यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर तथा पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत. अमित शहांच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार तयारी केली जातेय, मात्र ती करतानाच उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट केलं जातंय.
हेही वाचा… “राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी सावरकरांची माफी मागावी”
केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतार्थ मातोश्री परिसरामध्ये लागले बॅनर आणि होर्डिंग लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे बॅनर वर फोटो झळकवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेरच हे बॅनर्स लावल्याने त्यांची जास्त चर्चा होत आहे.
Read also
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने घडाळ्याबाबत…
हेही वाचा… “तुफान आ रहा है…”,मुंबईत अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची होणार परीक्षा?
हेही वाचा… मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाला, माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का?; अमोल कोल्हे यांनी दिलं उत्तर