भाजपाच्या प्रत्येक बूथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेतोय. ३० एप्रिलच्या मन की बातपर्यंत राज्यातील २५ लाखाच्यावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा आहे. बूथ सशक्तीकरण अभियनाचा आहे. सर्व बूथवर आमचा प्रवास सुरू आहे असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे.
हेही वाचा… “पवारांच्या मूक संमतीनेच राष्ट्रवादीचे लोक भाजपकडे जाणार”, शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा
बावनकुळे म्हणाले की, १ लाख बूथवर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातील ७०० पदाधिकारी बूथवर जात आहेत. आम्ही २५ लाख बूथ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करणार आहे. मोठ्या पक्षप्रवेशाबाबत मी बोलणार नाही. परंतु पक्षात कोणीही आले तरी त्यांना स्थान आहे. भाजपाची विचारधारा ज्यांना मान्य आहे त्यांनी पक्षात प्रवेश केला तर त्याला कुणाची हरकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!
तसेच भाजपात विचारधारेचा मुद्दा आहे. आमचे पहिले कर्तव्य देशासाठी तडजोड नाही. देव, देश, धर्म, संस्कृती यासाठी आम्ही काम करतो. कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षात कुणी आले तरी विचारधारेशी सहमत झाला तर आमची कुणाची हरकत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Read also
हेही वाचा… महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल..!
हेही वाचा… मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा