राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघाले आहे. पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित
शरद पवारांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आलीय का अशीही चर्चा सुरु झाली आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मुंबईत बैठकीसाठी निघाले आहे. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं सांगितलंय.
राष्ट्रवादीचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ‘पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आपण मुंबईकडे जात आहोत’, असे ते म्हणाले
सध्याच्या घडामोडीवर त्यांनी भाष्य करण्याचा टाळलं मात्र लवकरच आनंदाची बातमी मिळणार असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी सूचक विधान केल्याने नेमकं राष्ट्रवादीमध्ये काही तरी चाललंय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Read also
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
हेही वाचा… “पवारांच्या मूक संमतीनेच राष्ट्रवादीचे लोक भाजपकडे जाणार”, शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!