अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे काल पासून नॉट रिचेबल होते. मात्र आता धनंजय मुंडे हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालय नंतर धनंजय मुंडे हे विधानभवनात दाखल झाले आहे.
हेही वाचा… मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु
मुंडे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. मंत्रालयातील लोढा यांच्या कार्यालयातील धनंजय मुंडे यांचे फोटो समोर आले असून लोढा यांच्या भेटीनंतर ते आता अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दाखल झाले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!
दरम्यान, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आलीआहे. राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखला असल्याची माहिती मिळत आहे.
Read also
हेही वाचा… “अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य”; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने दिलं जाहीर समर्थन
हेही वाचा… “३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम”; बावनकुळेंचं पुन्हा मोठे विधान
हेही वाचा… महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल..!