महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही नेते गेल्या काही दिवसांपासून सूचक संकेत देत आहेत. त्यातच आता द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि या बातमीत करण्यात आलेले दावे, वर्तवण्यात आलेल्या शक्यता यांची पडताळणी सुरु आहे.
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे उत्तराधिकारी होण्यासाठी अजित पवार यांची तयारी सुरु झाल्याचा दावा याच वृत्तापत्रातून दोन दिवसांपूर्वीच्या बातमीत करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गोटातील हालचालींना वेग आल्याचं सांगितलं जातंय.अजित पवार यांच्या या निर्णयासाठी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि आमदारांच्या संमतीच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवेल, असे गृहित धरून शिदेंच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असा दावा याच वृत्तपत्राने केला होता.
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेण्यासाठी त्यांना फोन करून बोलावत आहेत, मात्र मोठे पवार यावर काहीही बोलत नाहीयेत. २०१९ मध्ये अजित पवार यांची बंडखोरी दिसून आली तेव्हा शरद पवार यांनी पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावून एकत्र राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आजच्या घडीला शरद पवार यांचा अजूनही फोन आलेला नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्राने सांगितल्याचा दावा वृत्तातून करण्यात आला आहे.
Big development: Senior NCP leader Ajit Pawar gets consent of his party’s 40 MLAs for his decision to join the hand with BJP. The signatures of these MLAs are also taken as a voluntary consent. @NewIndianXpress #Maharashtra pic.twitter.com/HjQMD6JP17
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) April 18, 2023
Read also
हेही वाचा… “अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य”; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने दिलं जाहीर समर्थन
हेही वाचा… “३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम”; बावनकुळेंचं पुन्हा मोठे विधान
हेही वाचा… महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल..!
हेही वाचा… मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु