बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं यावेळी त्यांनी सांगतले.
हेही वाचा…“सुनिल तटकरे हा तुमचा सेवक म्हणून याठिकाणी..” सुनील तटकरेंनी मतदारांना दिला ‘हा’ शब्द
ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचं यावेळीही सुनेत्रा पवारांनी नमूद केले. तर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी दुवा म्हणून मी ते काम नक्की करेन, असं सांगतानाच मी जे काम हाती घेते, ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचंही सुनेत्रा पवारांनी यावेळी नमूद केलं..
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. तसेच उंडवडी सुपे येथे प्रचार सभा आटोपल्यावर बारामतीकडे निघाल्या असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांना दिला.
तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही जेष्ठ नागरिक आले होते. त्यांच्याशीही सुनेत्रा वहिनी यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीच्या जागवाटपाचा अंतिम फॉर्म्युला, शिंदेंच्या जागा झाल्या कमी, वाचा सविस्तर
हेही वाचा…“राज्याची तिजोरी म्हणजे काय काकांची सत्ता वाटली का ? “शरद पवार गटाचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा….मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये कॉंग्रेसला जोरचा झटका, असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीत पेच वाढला, बावनकुळेंनी भुजबळांची घेतली भेट, म्हणाले…