पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर बारामतीत पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरू करून दिला आहे. अशातच दोन्ही बाजूंनी आता एकमेंकावर जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. अशातच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला आता अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती मतदारसंघात जाहीर सभा घेतांना दिसत आहे. या जाहीर सभांमधून अजित दादा सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतांना दिसत आहे. तसेच मागच्या खासदाराने मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाही. अशी टिकाही अजित पवार करतांना दिसत आहे. त्यावर गेले १७-१८ वर्ष एकत्र काम केलं, मात्र आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्यात वाईट गुण होते, तर इतके वर्ष गप्प का बसलात? आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली म्हणून आत्ता सगळं आठवतंय”, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, “१७-१८ वर्ष आम्ही ( सुप्रिया सुळे-अजित पवार ) आम्ही एका संघटनेत काम केलंय. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असे असे गुणे लोकं सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत. पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर १७- साडे १७ वर्ष गप्प कशाला बसलात? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत?”असा सवाल विचारत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केला होता. सुप्रिया सुळेंच्या या टीकेला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीच्या जागवाटपाचा अंतिम फॉर्म्युला, शिंदेंच्या जागा झाल्या कमी, वाचा सविस्तर
हेही वाचा…“राज्याची तिजोरी म्हणजे काय काकांची सत्ता वाटली का ? “शरद पवार गटाचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा….मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये कॉंग्रेसला जोरचा झटका, असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीत पेच वाढला, बावनकुळेंनी भुजबळांची घेतली भेट, म्हणाले…
हेही वाचा…“सुनिल तटकरे हा तुमचा सेवक म्हणून याठिकाणी..” सुनील तटकरेंनी मतदारांना दिला ‘हा’ शब्द