बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री धनंजय मुंडे यांची आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत पंकजाताईस या मतदारसंघातून सर्वात जास्त लीड मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर मतदारसंघातील गावातील सरपंचांना धनंजय मुंडे यांनी देखील मोठा इशारा दिला. आता हा व्हिडीओ ट्विट करून पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
सरपंचांना धमकी देणारा धनंजय मुंडे यांचा व्हिडीओ प्रशांत जगताप यांनी ट्विट केला आहे. त्यावर ते म्हणाले की, धनंजय मुंडे… कोणाला धमकी देताय ? राज्याची तिजोरी म्हणजे काय काकांची सत्ता वाटली का ? कधीही डल्ला मारायला ? हा माज आता अवघ्या काही दिवसांचा आहे ! असेही म्हणत प्रशांत जगताप यांनी धनंजय मुंडे यांना जोरचा इशारा दिला.
दरम्यान, या मेळाव्यात धनंजय मुंडे म्हणाले की, मराठवाड्याची पाण्याची तूट भरून काढण्याचा एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्च असलेल्या प्रकल्प प्रस्ताव स्तरावर आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बीड जिल्ह्यात जलक्रांती होईल. केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी आवश्यक निधी खेचून आणणे त्याचबरोबर बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून घेणे, यासाठी संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळात वजन असलेले खासदार आपल्याला निवडून द्यावे लागतील. मोदींजींच्या विकासाची गॅरंटी केवळ पंकजाताईच बीड जिल्ह्यात देऊन पूर्ण शकते, त्यामुळे पंकजाताईस आष्टी मतदारसंघात जिल्ह्यातून सर्वाधिक लीड द्यावी, या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन देखील मुंडेंनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.
धनंजय मुंडे…
कोणाला धमकी देताय ?
राज्याची तिजोरी म्हणजे काय काकांची सत्ता वाटली का कधीही डल्ला मारायला ? हा माज आता अवघ्या काही दिवसांचा आहे ! pic.twitter.com/82sIeAaFNF— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा….मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये कॉंग्रेसला जोरचा झटका, असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीत पेच वाढला, बावनकुळेंनी भुजबळांची घेतली भेट, म्हणाले…
हेही वाचा…“सुनिल तटकरे हा तुमचा सेवक म्हणून याठिकाणी..” सुनील तटकरेंनी मतदारांना दिला ‘हा’ शब्द
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये