मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीतला तिढा आज सुटलेला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महायुतीत भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाला १५ तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ४ जागा देण्यात आल्या आहे. अशातच महायुतीतून एक जागा ही महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीला मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत.
सुरूवातीपासून महायुतीत जागावाटपावरून अनेक मतदारसंघात रस्सीखेच सुरू होती. यातच आज नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने या जागेचा पेच सुटला आहे. तर दुसऱ्या बाजूला पालघरची जागा ही आता भाजपला गेली आहे. यातच शिंदे गटात असलेली रत्नागिरी-सिंधुदूर्गची जागा ही भाजपला मिळाली आहे. तर विदर्भातली रामटेकची जागा ही शिंदेंची होती, मात्र त्याठिकाणी भाजपने उमेदवार दिला आहे.
यातच अजित पवार गटाला महायुतीत चार जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाला महायुतीत बारामतीसह, शिरूर, रायगड आणि धाराशिव जागा मिळाल्या आहेत. तर परभणीची जागा ही महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या पाठिंब्यावर मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेने मागच्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ जागा लढवल्या होत्या. त्यातून शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्यातील महायुतीत शिंदे गटाला आता फक्त १५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या एकूण तीन जागा कमी झाल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना २१ जागा मिळाल्या असून त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. तर शरद पवार गटाला एकूण दहा तर कॉंग्रेसच्या वाट्याला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता लोकसभेच्या महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्याची तिजोरी म्हणजे काय काकांची सत्ता वाटली का ? “शरद पवार गटाचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा….मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये कॉंग्रेसला जोरचा झटका, असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीत पेच वाढला, बावनकुळेंनी भुजबळांची घेतली भेट, म्हणाले…
हेही वाचा…“सुनिल तटकरे हा तुमचा सेवक म्हणून याठिकाणी..” सुनील तटकरेंनी मतदारांना दिला ‘हा’ शब्द
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये