गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज राष्ट्रवादीच्या गोटात पुन्हा एकदा वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.
हेही वाचा… भाजपसोबत जाणार की नाही?; अजित पवारांकडून मोठा खुलासा
राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांची अजित पवार यांच्या सोबत गुप्त बैठक एका हॉटेल मध्ये बैठक झाल्याची चर्चा आहे.
तसेच छगन भुजबळ आणि आमदार अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर गेले आहेत. अजित पवार आणि भुजबळ यांच्यासह अनेक जेष्ठ नेते देखील या बैठकीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत समजू शकलं नाही कोण नेते देवगिरीवर उपस्थित आहेत.
हेही वाचा… अजितदादांच्या चर्चांवर फडणवीसांची चुप्पी म्हणजे राजकीय भूकंपापूर्वीची शांताता?
दरम्यान, अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. काही बातम्या या मुद्दाम पेरल्या जात आहेत. मी कायम राष्ट्रवादीसोबतच राहील असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज बैठक बोलावण्यात आली आहे.
Read also
हेही वाचा… “सर्वांचीच तोंडे बंद…”; अजित पवारांच्या खुलाशानंतर मिटकरींचा टोला
हेही वाचा… “त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक?”; अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलचं झापलं..!