रांची : बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे. परंतु, सर्वच एक्झिट पोलमध्ये राजद नेता तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारतं हे पाहण्याचे ठरणार आहे.
धानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 10 नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे. त्याआधी 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत 71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र त्याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहे बिहारमध्ये नितीश कुमारयांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे.