पुणे : कोल्हापूरच्या मतदार संघाकडे पाठ फिरवत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मतदार संघाची निवड करत सोपी खेळी खेळली, असे आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने होत असतात. काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी केलेले आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य देखील चर्चेत होते. आता हाच धागा पकडून चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातूनही निवडून आणू, असे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील जर म्हणाले की, मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार आहे. तर त्यांना नक्कीच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेनचंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांना 100% निवडून आणू. त्यांचा प्रचारप्रमुख पण मी होईन, असे संजय काकडे म्हणाले.
तर दुसरीकडे पुण्यातील 19 नगरसेवक भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. याविषयी देखील काकडे यांनी भाष्य केले.
संजय काकडे म्हणाले की, आमचे भाजपाचे 98 नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. काही जण अफवा पसरवत आहेत. निवडणुका जवळ आल्या की, अशा चर्चाना सुरुवात होत असते.
Read Also :
- … म्हणून अभिजीत बिचुकले थेट ठाकरे सरकारविरोधात करणार आंदोलन
- कोरोना काळात दाखल करण्यात आलेले ‘ते’ गुन्हे मागे घेणार, गृहमंत्र्यांची माहिती
- ‘धनंजय मुंडे चौकशीत दोषी आढळले तर…’, शरद पवारांचे स्पष्टीकरण
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांचं आहे थेट नागपूरशी नातं
- ठाकरे सरकारने हटवली होती नारायण राणेंची सुरक्षा, आता केंद्राने घेतला मोठा निर्णय