नागपूर : डेमोक्रेटिक पक्षाचे जो बाइडन यांनी अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. अमेरिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द वादळी ठरली होती. पद सोडताना देखील ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार झाला होता. त्यामुळे आता जो बाइडन यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. बाइडन यांच्यासह भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
अमेरिकेच्या या दोन्ही राष्ट्रप्रमुखांचे भारताशी काहीना काही नाते आहे. कमला हॅरिस या भारतीय आहेतच, मात्र यासोबत राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांचे देखील महाराष्ट्राशी नाते आहे.
बायडन यांचे काही नातेवाईक महाराष्ट्रातील नागपूरमध्ये राहत आहेत. स्वत: बायडन यांनीही एकदा भारतात आल्यावर या गोष्टीचा खुलासा केला होता. पहिल्यांदा बायडन यांनी त्यांच्या नातेवाईकांचा उल्लेख 2013 आणि 2015 मध्ये केला होता. 2013 मध्ये जो बायडन जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते, तेव्हा भारतात आले असताना त्यांनी आपल्या नातेवाईकांचा उल्लेख केला होता.
1972मध्ये सीनेटर बनल्यानंतर मला भारतातून एक पत्रं आलं होतं. त्यात माझे महान आजोबा ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होते, असा उल्लेख होता, अशी माहिती बाइडन यांनी दिली होती.
नागपूर येथे राहणारे लेस्ली बायडन 15 एप्रिल 1981 मध्ये एक पत्र पाठवून बायडन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर 30 मे 1981 रोजी बायडन यांनीही लेस्ली यांना उत्तर दिले होते. पुढे मात्र त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नसल्याची खंत देखील जो बाइडन यांनी व्यक्त केली होती.
तर दुसरीकडे, लेस्ली यांनी जो बायडन यांच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचे म्हटले असले तरी लेस्ली यांच्या नातवंडांच्या मते, आमचा असा कुठलाही दावा नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमचे आजोबा लेस्ली यांनी हा दावा केवळ त्यांच्याकडे असलेल्या वंशावळाच्या माहितीवरून केला असून शकतो. मात्र, आम्ही असा कुठलाही दावा करीत नसल्याचे लेस्ली यांचे नातू इयान बायडन यांचे म्हणणे आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारने हटवली होती नारायण राणेंची सुरक्षा, आता केंद्राने घेतला मोठा निर्णय
- ‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’, कर्नाटकच्या मंत्र्याची धमकी
- ‘पुरोगामी पवारसाहेब तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेंना पाठीशी घालणारे असेल; पण…’
- ‘ते 36 वर आउट झाले, आपल्याला 44 जागा मिळाल्या’, भारताच्या विजयातून प्रेरणा घेण्याचा नेत्याचा काँग्रेसला सल्ला
- आजपासूनच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी